Thursday 10 May 2018

कविता – लगेच ये रे



गळाभेट होता तुझी कुणाशीही
अटळ त्याचे विलीन होणे तुझ्याशी
टाळतो आहेस कदाचित म्हणूनही  
अशी गळाभेट तू माझ्याशी 

अविरत सरकता हा पट्टा काळाचा
न चालूनही एकमेकांकडे घडविणार भेट अपुली
अविचार का तुझा निरुपायाने भेटण्याचा
असता अटळ भेट अपुली

लगेच ये रे भेटायाला
तयार मी तुझ्यात विलीन होण्याला


(दिनांक – ९ – १०/०५/२०१८, निर्माण भवन – दिल्ली)




1 comment:

  1. मित्र, सखा सहोदर काय म्हणू तुला? माझ्या जन्माच्या क्षणीच तुझाही जन्म झालाय. पावलापावलावर तुझे अस्तित्व जाणवते मला. जन्माचा साथीदार सोबती आहेस तू माझा. तुझ्या इतकी अखंड सोबत खरेतर कोणीच नाही केलेली माझी. ओळख तर आहेच आपली. भेटही झालीये काहीवेळा, अगदी जवळून ही, अगदी तू कवेत घेतलेही होतेस, मी ही अलगद स्वतःला तुझ्या हाती सोपवले होतेच की. पण मग तू परत गेलास, मलाच चकवून. तुझे अस्तित्व माझ्या जगण्याचा आधार, माझे आयुष्य तरी काय आहे दोन क्षणांमधील काळ आहे एक क्षण जो तुझ्यात विलीन होण्याचा .... खरेतर हा सारा तुझ्या दिशेने प्रवास आहे. आखीव रेखीव असा. तुझे अस्तित्व माझ्या जगण्याचा आधार आहे. अद्वैत आहे आपले, आणि मला ते नुसतेच मान्य नाही तर हवेहवेसे ही आहे .... म्हणून तू ये रे .... लगेच ये, असेही काही नाही, जितकी सोबत कराविशी वाटेल तुला, तितकी मी तुझ्यासोबत आनंदाने चालेन. ज्या क्षणी तुझी इच्छा असेल त्याक्षणी तुझ्या सोबतची सात पावले मी टाकू लागेन. मी तुझीच आहे.

    ReplyDelete