Monday 15 June 2015

कविता – का जगता?

ब्लॉग दिनांक १५/०६/२०१५

कविता केंव्हा सुचेल आणि केंव्हा पूर्ण होईल काही नक्की नाही. आज ब्लॉगवर ठेवतो आहे ती कविता ३३ वर्षापूर्वी मी फक्त एका कडव्याच्या स्वरुपात लिहिली होती. खर तर ०९/०१/१९८२ रोजी काय घडले होते आता आठवत नाही पण तारीखेच्या नोंधींवरून असे दिसते की मी त्या दिवशी ३ कविता लिहिल्या होत्या. दोन पूर्ण आणि एक ही अशी फक्त एक कडव्याची. त्या बाकीच्या दोन्ही कविता ‘कुठवर’ आणि ‘अपेक्षा’ आधीच revise करून ब्लॉग ठेवल्या आहेत.

ही कविता अलीकडे जरी पूर्ण झाली तरी आता सुचलेल्या ओळीच किंवा विचारच त्या वेळेस कविता सुचली असती तर आज कवितेत आले असते असे नाही, त्यामुळे ही कविता नवीच मानवी लागेल .........

कविता – का जगता? - मूळ लेखन ०९/०१/१९८२; पुनर्लेखन ०२/०६/२०१५

(मूळ लेखन पहिल्या कडव्याचे ०९/०१/१९८२; पुनर्लेखन, नवे लेखन  ०२/०६/२०१५; दुपारी १.०० ते ४.०० बडोदे घरी)

का जगता ?
उमटणाऱ्या, विरणाऱ्या लाटा होऊन
घेऊन बंधन किनाऱ्याचे                        ||

का जगता ?
आशा-आकांशा आवड-निवड मारून
जगून आयुष्य चाकोरीचे                       ||

का जगता ?
भूत-भविष्यकाळात रमून
हरवून क्षण वर्तमानाचे                        ||

का जगता
देव-देवस्की, अंधश्रध्दा, कर्मकांड जोपासून
पाप – पुण्याचे हिशोब मांडून

बाळगून भय मृत्यूचे                          ||

No comments:

Post a Comment