Tuesday 16 June 2015

कविता – का?

दिनांक १६/०६/२०१५

ह्या कवितेचे पण तेच झाले, पुनर्लेखन करताना कमी अधिक बदल तर होतातच कवितेत पण दोन नवी कडवी पण सुचली - त्यामुळे आनंद द्विगुणित झाला .......

  कविता – का? - मूळ लेखन ०२/०५/१९८६; पुनर्लेखन १५/०६/२०१५

(मूळ लेखन ०२/०५/१९८६ सकाळी ९.० ते ११.०; पुनर्लेखन १५/०६/२०१५ दुपारी ३.१५ ते ३.४५)

प्रत्येक सजणारी संध्या
अगणित रंगछटांची मनमोहक उधळणं
तरीही उदास का?                                  ||१||

प्रत्येक उफाळणारी लाट
एक ताकदवर बेफाम आक्रमण
तरीही किनाऱ्याचे बंधित का ?                       ||२||

प्रत्येक नाते
घट्ट बंध विणीत एकदुसऱ्याला मोकळे सोडणं
तरीही अपेक्षेच्या शृंखलेत कैद का?             ||३|| (लेखन १५/०६/२०१५ दुपारी ४.० ते ४.३०)

प्रत्येक प्रेम,
माणसाचे ‘स्व’ च्या पलीकडे जाणं
तरीही अधिकाराने, अहंकाराने बद्ध का?        ||४|| (लेखन १५/०६/२०१५ दुपारी ४.० ते ४.३०)

प्रत्येक प्रेषित
देतो मानवतेची, अहिंसेची शिकवण
तरीही त्याच्याच अनुयायांनी वध्य का ?                ||५||

प्रत्येक धर्म
मागतो त्याग, करुणा, समतेचे आचरण

तरीही स्वार्थ, हिंसा, भेदभावाने ग्रस्त का?               ||६||

No comments:

Post a Comment