दिनांक - ०८/०५/२०१५ - संवाद अज्ञाताशी, शोधण्या अज्ञाताला ९
काल Heinrich Zimmer यांचे त्यांच्या मृत्युनंतर Joseph Campbell यांनी संपादित केलेले "Philosophies of India" हे पुस्तक वाचायला सुरवात केले आणि ह्या पुस्तकाचे पहिले प्रकरण 'The Roar of Awakening' वाचताना त्यातील विचारांवरून ही कविता सुचली.
ऋत (वैश्विक सत्य / तत्व) एकाच आहे, अविनाशी आहे आणि ते काळाबरोबर बदलत रहाते, नव्या संकल्पना, new idioms, new symbols घेऊन बदलत्या काळाप्रमाणे, बदललेल्या आपल्याप्रमाणे त्याचे नव्याने प्रकटीकरण आपण करावयास हवे. देव विकत, उधार घेता येत नाही तो आपल्यातून जन्माला आला तर तो आपला वाटेल, आपलाल्या पटेल असे सारे विचार ह्या वाचनात मिळाले आणि मग काय कवितेत उतरले .......
कविता
- लवकरच मिळशील मला
काल Heinrich Zimmer यांचे त्यांच्या मृत्युनंतर Joseph Campbell यांनी संपादित केलेले "Philosophies of India" हे पुस्तक वाचायला सुरवात केले आणि ह्या पुस्तकाचे पहिले प्रकरण 'The Roar of Awakening' वाचताना त्यातील विचारांवरून ही कविता सुचली.
मी ह्या आधीच्या 'त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसी' ह्या कवितेत आणि त्यावर लिहिलेल्या ब्लॉग मध्ये आधीच्या संस्कृतींनी निर्माण केलेल्या, भजलेल्या , पुजलेल्या देवाचा ऱ्हास - अंत त्या संस्कृतींबरोबर कसा झाला, त्या तत्वाने (देवाने) तो कसा होऊ दिला, आज त्या तत्वाची अनेक रूपे कालबाह्य वाटतात, आजच्या मनाला appeal होत नाही, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, स्वर्ग, नर्क ह्या साऱ्या संकल्पना विज्ञानाने खोट्या ठरविल्या आहे आणि तरीही आजही नवे देव निर्माण होत आहेत ह्या विषयी मनातले प्रश्न उभे केले होते. एकच अंतिम वैश्विक सत्य / तत्व (ऋत ) असेलच तर त्याची अनेक ज्ञात ठिकाणातून पीछेहाट झाली आहे, आता त्याचे अस्तित्व मानायचे तर ते ज्ञानाच्या - विज्ञानाच्या रोज विस्तारणाऱ्या क्षिताजापलीकडेच मानावे लागेल असे काहीसे लिहिले होते. मी जे लिहिले होते तेच प्रश्न उभे करून त्या प्रश्नांचे एक शक्य उत्तर / एक शक्य दृष्टीकोन ह्या पहिल्या प्रकरणात मांडलेले वाचून आनंद झाला. त्या ओळीच इथे देतो आहे -
For where dwell the gods to whom we can uplift our hands, send forth our prayers, and make oblation? Beyond the Milky Way are only island universes, galaxy beyond galaxy in the infinitudes of space-no realm of angels, no heavenly mansions, no choirs o[ the blessed surrounding a divine throne of the Father, revolving in beatific consciousness about the axial mystery of the Trinity. Is there; any region left in all these great reaches where the soul on its quest might expect to arrive at the feet of God, having become divested of its own material coil? Or must we not now turn rather inward, seek the divine internally, in the deepest vault, beneath the floor; hearken within lot the secret voice that is both commanding and consoling; draw from inside the grace which passeth all understanding?
We must enter the new period our own
way and solve its questions for ourselves, because though truth, the radiance
of reality, is universally one and the same, it is mirrored variously according
to the mediums in which it is reflected. Truth appears differently in different
lands and ages according to the living materials out of which its symbols are
hewn.
The truth that we bring to manifestation
be as much our own flesh and blood as is the child its mother's; and the
mother, in love with the Father, will then justly delight in her offspring as
His duplication. The ineffable seed must be conceived, gestated, and brought
forth from our own substance, fed by our blood, if it is to be the true child
through which its mother is reborn: and the Father, the divine Transcendent
Principle, will then also be reborn delivered, that is to say, from the state
of non-manifestation, non-action, apparent non-existence. We cannot borrow God.
We must effect His new incarnation from within ourselves. Divinity must
descend, somehow, into the matter of our own existence and participate in this peculiar
life-process.
– Heinrich Zimmer / Joseph Campbell in Philosophies of India.
ऋत (वैश्विक सत्य / तत्व) एकाच आहे, अविनाशी आहे आणि ते काळाबरोबर बदलत रहाते, नव्या संकल्पना, new idioms, new symbols घेऊन बदलत्या काळाप्रमाणे, बदललेल्या आपल्याप्रमाणे त्याचे नव्याने प्रकटीकरण आपण करावयास हवे. देव विकत, उधार घेता येत नाही तो आपल्यातून जन्माला आला तर तो आपला वाटेल, आपलाल्या पटेल असे सारे विचार ह्या वाचनात मिळाले आणि मग काय कवितेत उतरले .......
कविता
- लवकरच मिळशील मला
(मूळ लेखन – ०७/०५/२०१५ KUIDFC ऑफिस,
हॉटेल शिल्टन, बँगलोर; ०७/०५ दुपार ते ०८०५ सकाळ )
शास्त्रातून, धर्मग्रंथातून
परंपरेतून, संस्कृतींतून
माता पिता, गुरूंकडून
अगदी कुणाहीकडून
संस्काराने, सवयीने,
अगतिकतेने, अविचाराने
भीतीने, उधारीने, खरेदीने,
अंधश्रद्धेने, येन केन प्रकारेने
तुला देव म्हणून घेताना
स्वीकारताना पहिले साऱ्यांना ||
मी ही मग देवा तुला साऱ्यांकडून
साऱ्या प्रकारे, साऱ्या साधनांतून,
घेतला, चिंतला, भजला, पूजला
पण तू नाही पटला, नाही मिळाला
तुला शोधण्याचा मग नादच लागला
तुला नाकारणाऱ्यांमध्ये शोधला
डोळसपणे स्वीकारणाऱ्यांमध्ये शोधला
ज्यांना तू मिळालास त्या रुपातही शोधला
शेवटी उमजले घेता-देता येत नाही
तुला कोणाकडूनही, कशाप्रकारेही
जन्माला घालावा लागतो स्वतःमधून
गर्भारपणाच्या, प्रसूतीच्या वेदना सोसून
||
वाढवतोय बिजतत्त्वाला तुझ्या
मनात, अणुरेणुत, आत्मतत्वात माझ्या
लवकरच मिळशील मला
एकाच नाळेने जोडलेला
माझ्या रक्तमांसातून जन्मलेला
माझ्या मनीच्या स्वरूपातला
बदलून अंतर्बाह्य मला, स्वतःला
माझ्यासाठी माझ्यातून अवतरलेला ||
No comments:
Post a Comment