दिनांक - १७/०५/२०१५
कविता
– स्वप्नांनो
कविता
– स्वप्नांनो
(मूळ लेखन – २८/१२/१९८१ बडोदे,
पुनर्लेखन १६/०५/२०१५ संध्याकाळी ६.३० ते ७.० बडोदे घरी)
स्वप्नांनो
का फोफावता
निवडूंगासारखे
फैलावण्या वाळवंट
या जीवनात ||
स्वप्नांनो
का येता
दवबिंदू होऊन
जाण्यासाठी विरून ||
या जीवनात
स्वप्नांनो
का पेटविता
अणुरेणुंची तहान
मृगजळ होऊन
या जीवनात ||
स्वप्नांनो
का करता
अट्टाहास मृत स्वप्नांचा
आकांक्षांना जगविण्याचा,
या जीवनात ||
No comments:
Post a Comment