दिनांक - ०३/०५/२०१५
कविता – कुठवर
(मूळ लेखन १९८२-८३; पुनर्लेखन ०२/०५/२०१५ दुपारी ३.० ते ४.०
बडोदे घरी )
कुठवर शोध घ्यायचा
धुक्यात विरणाऱ्या आकृतींचा |
कुठवर खुणा जपायच्या
वाळूत उमटलेल्या पावलांच्या |
कुठवर मागोवा घ्यायचा
ब्रम्हांडात ताऱ्यांच्या किरणांचा |
कुठवर पाठलाग करायचा
पुढेपुढे पळणाऱ्या
मृगजळाचा |
कुठवर व्यर्थ पकडायचे
क्षण गतिशील कालचक्राचे |
कुठवर मूल्य मोलायचे
व्यवहाराने कुठल्याही भावनेचे |
कुठवर क्षणभंगुर जीवन जगायचे
भावनाशून्यतेचे, निरूपायाचे,
बेभरवशाचे |
No comments:
Post a Comment