दिनांक
– १२/०७/२०१४
कविता
– बिंब – प्रतिबिंब
आपल्या
मनाच्या, अंतरंगाच्या अंतस्थ कोषात जाणे
म्हणजे
विविध अंशकोनात मांडलेल्या आरश्यांच्या महालात जाणे ||
चहुकडील
आरश्यात आपली अगणित प्रतिबिंबे
वेगवेगळ्या
कोनातून, अगणित एकमेकांना पाहणारी असंख्य प्रतिबिंबे
नव्हे
आपल्यालाच चहुबाजूनी एकाच वेळी पाहणारे असंख्य आपण
वा
एकमेकांना पाहणाऱ्या अगणित प्रतीबिम्बाना पाहणारे आपण ||
बिंबाला,
बिंबाच्या प्रतिबिंबाना पाहणारी प्रतिबिंबे
स्वतःला,
स्वतःच्या प्रतिबिंबाना पाहणारी प्रतिबिंबे
प्रतिबिंबे
पाहणारे बिंब वा बिंब होणारी प्रतिबिंबे
कोण
बिंब? कोण प्रतिबिंब? कोणाची प्रतिबिंबे? ||
विचार-बुद्धी
सारे संमोहित, भ्रमिष्ट होण्याआधी
स्वतःची
ओळख विसरून कोषात कैद होण्याआधी
जीवाच्या
आकांताने पळून यायचे कोशातून
वा
टाकायचे क्षणात साऱ्या आरश्यांना फोडून ||
आता
अवतीभवती आरश्यांच्या तुकड्यांत प्रतिबिंबे विखुरलेली
मध्यभागी
ढिगावारी माझी बिम्बे छिन्नविछिन्नलेली
ओळख
पुसणाऱ्या, अस्तित्वाला गिळणाऱ्या आरश्यांना
फोडले
बिम्बाने, प्रतिबिम्बाने की स्वतःला स्वतःने ||
(year 1998 poem revised thoroughly today during 9 to 11 am. at Baroda Residence)
This comment has been removed by the author.
ReplyDelete