दिनांक - २०/०३/२०१५
कविता – तू सापडलास (मूळ लेखन
११/०६/१९९६; पुनर्लेखन
१४/०३/२०१५)
कविता – तू सापडलास (मूळ लेखन
११/०६/१९९६; पुनर्लेखन
१४/०३/२०१५)
(मूळ कविता–दिनांक ११/०६/१९९६ दुपारी ४.३० ते
५.३० TSS Office,washington; पुनर्लेखन १४/०३/२०१५ सकाळी घरी )
कळता तू असतोस चराचरात
शोधावयास घेणारच होतो तुला
अवतीभवतीच्या माणसामाणसात
तर तू दाखविल्यास वाकुल्या
एकांताच्या सीमेवरून मला ||
एकट्याने तुला भेटण्याचा मोह पडला
तूही निष्ठेने फशी पाडून आणलेस मला
एकांताच्या वाळवंटात मृगजळ होऊन
अन नाहीसा झालास मला एकटा करून ||
येऊ लागले मग, तुझे फसवे संदेश चहु दिशांतून
क्षितिजापलीकडील सोडून आलेल्या मानवी
वस्त्यांतून
अर्थच नव्हता तुझ्या फसव्या लपाछपीच्या खेळात
सामील होऊन तुझ्या मागे फटफटण्यात ||
निराशेने, रागाने गाडण्या स्वतःला स्वत:त
खोदत गेलो चर खोल डोहासारखा
अचानक तू सापडलास अंतरात
बक्कळ गोड पाण्याच्या झऱ्यासारखा ||
No comments:
Post a Comment