दिनांक - १०/०५/२०१५
कविता – कधीतरी तू परत फिरशील (मूळ लेखन १९८२-८३; पुनर्लेखन
१०/०५/२०१५)
कविता – कधीतरी तू परत फिरशील (मूळ लेखन १९८२-८३; पुनर्लेखन
१०/०५/२०१५)
(मूळ लेखन १९८२-८३; पुनर्लेखन
१०/०५/२०१५, दुपारी
१२ ते २.०, बडोदे घरी)
गेले दिवसेंदिवस मी एकटाच बसलोय
महासागराच्या किनार्यावरती तुझ्या प्रतीक्षेत
||
भरतीची प्रत्येक लाट मी झेलतोय
जाणण्यासाठी तुझा ठावठिकाणा
जीवनात कधीतरी तू आली होतीस
अशीच उचंबळून बेभान लाटेसारखी ||
ओह्टीने उघड्या पडलेल्या किनाऱ्याला, रेतीच्या
कणांना
विचारतो मी परत फिरलेल्या लाटांचा
ठावठिकाणा
मला नको असतानाही तू परत फिरली होतीस
भरती नंतर ओहटी या न्यायाने ||
मुद्दामच मी बसून आहे अजूनही सागरतटावर
किनाऱ्यावर येऊन परतलेली लाट
किनाऱ्यावर परत येऊ शकते का?
हे शोधण्यासाठी, तिचे येणे
अनुभवण्यासाठी ||
पण अजून एकदाही, येऊन परतलेली लाट
किनार्याकडे परत आलीच नाही,
जशी तू कधीच माझ्या जीवनात
परतलीस नाही ओहटलेल्या लाटेसारखी ||
तरीही मी किनाऱ्यावरच बसणार
लावणार अर्थ येणाऱ्या प्रत्येक लाटेचा
भरती-ओह्टीने बुडणाऱ्या, उघड्या
पडणाऱ्या
किनाऱ्याच्या, रेतीच्या कणांच्या संवेदनांचा
||
कधीतरी, दूर परत फिरलेली लाट येऊन
मुक्त होईल
संपेल प्रतीक्षा किनाऱ्याची अनंतकाळापासूनची
उठून किनाऱ्यावरून चालू लागेन मी घराकडे,
समाजाकडे
घेत दिलासा परतलेल्या लाटेकडून, बुडलेल्या
किनार्याकडून ||
कधीतरी तू पण त्या लाटेसारखी परत
फिरशील
संपेल प्रतीक्षा माझीही अनंतकाळापासूनची
||
तू काही लिहिलेस कि तोच धागा घेऊन मला काही सुचते, पूरक, जोडकविता असे काहीसे.
ReplyDeleteकविता काही दशकांपूर्वीची......
कविता काही वर्षांपूर्वीची.....
कविता आजची......
कदाचित उद्याची ही.........
तेच राहिल वाट पहाणे
तेच राहिल लाटा मोजणे
तेच राहिल पायांचे वाळूत रूतणे
तेच राहिल भरती ओहटीचा अर्थ शोधणे
असाच चालू राहिल शोध
तिच्या नुरल्या अस्तित्त्वाचा
तिच्या पाऊलखुणांच्या
गाजेतून ऐकू येणार्या तिच्या सादे चा
व्यर्थ शोधतोयस वेड्या तिला लाटांमधे
नाही सापडायची कोणत्याच किनार्यावर
आत डोकाव जरा मनात
तिच्या आठवणींची प्रत्येक लाट
येऊन आदळते मनात तुझ्या
परतली कुठे आहे ती
हरवली कुठे आहे ती
मन व्यापूनही तुझे ती
ऊरते चराचरात ती