Saturday 12 April 2014

कविता - बदललेला तो

दिनांक १२/०४/२०१४

प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे सामर्थ्य, सौंदर्य आणि सौष्ठव असते. एकाहून अधिक भाषांवर मनापासून प्रेम केले कि त्या शिकावयास  वेळ लागत नाही आणि अश्या प्रेमाने शिकलेल्या भाषेतून व्यक्त व्हायचा प्रयत्न केला कि त्या भाषा आत्मसात व्हायला वेळ लागत नाही. भाषा आत्मसात होणे म्हणजे तिचा आत्मा आपल्या आत्म्याला समजू लागणे. काही रचना ह्या अमुक एक भाषेत अधिक चांगल्या जमतात - गझल उर्दूत, छंदबद्ध कविता, भावकविता आणि वैचारिक आणि मुक्त छंद कविता मराठी आणि हिंदीत, तर गझल आणि अत्यंत तरल कविता गुजराथीत. 

खालील कविता अनेक वर्ष मला मराठीत जमतच नव्हती, मग एक दिवस ती गुजराथी भाषेत केली आणि मनाजोगी वाटली. मग तिचे मराठीत स्वतःच स्वैर रुपांतर केले. आधी गुजराथी या माझ्या मावस भाषेत आणि मग तीच कविता मायभाषेत लिहिण्याची अनुभूती 'फिरुनी नवी जन्मेन मी' सारखी.  दोन्ही भाषेतील कविता गेले १० वर्षे कच्या स्वरुपात पडून होत्या, आज त्यांना पूर्ण (for time being) केल्या. 

કવિતા - બદલાયેલો એ 

પહેલા એ  પગપાળા ફરનારો,
 ક્યારેક બસથી મુસફીરી કરનારો હતો;
ચોકમાં કાર્સને ઘેરી વળતા ભીકારીઓને જોઇને એ  વ્યથિત થતો,
ગુસ્સે થતો  ભીખ ન આપનારા શ્રીમંતોપર ।।

ક્યારેક કોઈ ભિખારી એના સામે પણ હાથ ફેલાવતો ,
ખાલી ખિસ્સા ફંફોળતો નીકળી જતો એ અપરાધી ભાવે ।

મેહનતથી કે નસીબથી એ પણ ફેરવતો  થયો પોતાનું વાહન ,
હવે રીક્ષા, ટાકસી કે એના વાહનમાંથી મુસાફીરી વખતે ,
ભીખારીઓ એને પણ ઘેરી વળવા લાગ્યા,
ફેલાવીને ખાલી હાથ છેક વાહનની અંદર એની સામે ।।

મોટા ભાગે એ ગુસ્સેજ થતો આ બિનમેહનતું  લોકોપર,
ક્યારેક ભીખ આપતો મહેનતની શિખામણ સાથે  ।

હવે તો એ  ફરે છે વિમાનોમાં, શોફરવાળી લક્ઝરી કાર્સમાં,
જગોજગોપર બંદ કાચની એની કારને ઘેરી વળતા ભિખારીઓને જોઈ,
એ નથી વ્યથિત થતો કે નથી થતો ગુસ્સે કોઈનાપર ,
નથી હવે એનામાં અપરાધીપણું કે નથી આપવી એને શિખામણ મેહનતની ।।

એની દુનિયામાંથી ભીખારીઓ, એમની ગરીબી, એમનાં પ્રત્યેની ભાવનાઓને
એના મનમાંથી, જીવનમાંથી હદપાર કરવાની કળા સીખી ગયો છે એ  ।

(લખ્યા તારીખ 02/12/2002 ઘરે રાત્રે 8 થી 10 કલાકે, સંસ્કરણ 12/04/2014 બપોરે 2 -3 કલાકે)


कविता - बदललेला तो 

पूर्वी तो पायी चालणारा,
कधी तरी बसने फिरणारा होता
चार रस्त्यावर गाड्यांभोवती पडणारे
भिखाऱ्याचे कोंडाळे त्याला व्यथित करीत असे
रागही येत असे भिख न घालणाऱ्या  श्रीमंतांचा ।

क्वचित कोण्या भिखाऱ्याने चुकून पसरलाच हाथ त्याच्यासमोर
तर तो रिकामे खिसे उगाचच चाचपडत निघून जात असे अपराधीपणे ।

मेहनतीने वा  नशिबाने तो फिरू लागला स्वतःच्या वाहनाने,
रिक्षा, टक्सी वा  स्वतःच्या वाहनाने फिरताना
वाहनांच्या आत अगदी त्याच्यापर्यंत हाथ पसरवणाऱ्या
भिखाऱ्याचे कोंडाळे त्यालाही पडू लागले ।

बहुतेक वेळा तो चिडायचा त्या बिनमेहनतु लोकांवर,
क्वचित भिख द्यायचा मेहनत करण्याची शिकवण देत ।

आता तो फिरतो विमानात, शोफरवाल्या महागड्या गाड्यानमधून,
जागोजागी बंद काचेच्या त्याच्या गाडीला घेरणारे भिखारी  पाहून
चीडही येत नाही कोणाचीही वा व्यथितही  होत नाही तो कोणासाठी
नाही उरला तो अपराधीभाव, नाही ते मेहनतीची शिकवण देणे ।

त्याच्या भावविश्वातून भिखारयाना, त्यांच्या विषयीच्या भावनांना
हद्दपार करण्याची श्रीमंती कला शिकला आहे तो आता  ।

1 comment:

  1. Sundar che aa jeevan na valanko
    ena thi pan sundar rite madhya tame shabdo kera jaal ma ene

    ReplyDelete