दिनांक २४/०५/२०१४
कविता - हि वेळ कठीण आहे पोरा
उमजताहेत तुझ्या पौगंडावस्थेच्या वेदना
स्व च्या जडण – घडणीची हि गर्भावस्था
असुरक्षित, घुसमटवणारी; वेदनामय असते पोरा |१|
येत असताना तुझा जीव – शरीर आकाराला
जपले निसर्गापासून साऱ्यांनी फुलासारखे तुला
ह्यावेळी तुझाच तू एकटा,
सारे सरसावलेले अस्त्र-शस्त्रांनिशी
आकारावायला तुझ्या व्यक्तित्वाला
हि वेळ खरच कठीण आहे पोरा |२|
घडवायचा आहे आम्हाला तुला
आमच्यासारखा साचेबंद, बिनचेहऱ्याचा
स्वतःच्या स्वकियांशी लढण्याची हि अर्जुन अवस्था
हतप्रभ,
निष्क्रिय करणारी असते पोरा |३|
मनाला जाणवणारया स्वतःसाठीच्या
आभासी, अस्पष्ट अन सतत बदलत्या प्रतिमांच्या
चक्रव्युहाला भेदण्याची हि अभिमन्यू अवस्था
अपुऱ्या ज्ञानाची,
आत्मघातकी असते पोरा |४|
ठेवुनी एक डोळा भूतकालीन आम्हावर,
दुसरा तुला मोहणाऱ्या भविष्यावर
घडव स्वतःला आतून एकलव्यासारखा
हि स्वघडणीची एकलव्यी साधना
अत्यंत अवघड तरीही
सार्थकी असते पोरा |५|
(originally composed on 24/07/2001 around 11.0
am in HUDCO New Delhi Office and in the evening in Hotel Zen around 5.30 pm.
Thoroughly revised on 23/05/2014 during 11 to 12 pm)
छान...
ReplyDelete