दिनांक – १८/५/२०१४
नोकरी सोडताना ४
बडोदे महानगर पालिकेतील नोकरी जरी २००२ साली सोडली तरी ती
सोडण्याविषयीचा विचार १९९७ साली रुजला आणि राजीनामा देणे शक्य नव्हते म्हणून
SOCLEENSOCLEEN या संस्थेने घेतलेल्या Baroda Beyond 2000AD या प्रोजेक्टवर deputation वर जाण्याची दरखास्त कोर्पोरेशन कडून मंजूर करून घेतली होती आणि एक वेळ
अशी आली होती कि ओर्डर झाली कि प्रोजेक्टवर कॉर्पोरेशन सोडून जायचे, अर्थात ते
जाणे झाले नाही आणि कोर्पोरेशन मध्येच २००२ ला नोकरी सोडे पर्यंत राहणे झाले. हि
कविता तेंव्हाची जेंव्हा आता काही दिवसात मी कोर्पोरेशन सोडणार असे वाटत होते.
कविता – संपेल आता दररोजचे
संपेल आता दररोजचे
सत्तेच्या अति-नील प्रकाशाने झळाळलेल्या
कॅबीनमध्ये जाऊन ते सुपरमॅन होणे
कुण्या अज्ञातासाठी सत्ता वापरणे
असहाय्यपणे ते भोगले जाणे
अन अनिच्छेने ते इतरांना भोगणे |
संपेल आता दररोजची
सज्जनातून दुर्जन अन पुंन्हा सज्जन होण्याची
ससेहोलपट ती जीवघेणी ||
संपेल आता दररोजचा
विळखा भ्रष्ट कुत्र्यांचा
तुकडे टाकतोय तो पर्यंत गोंडा घोळणाऱ्या
नाहीतर मलाच खाऊन संपविणाऱ्या ||
संपेल आता दररोजचे
दुःस्वप्न हे कदाचित माझापुरते
पण सत्तेची ती कॅबीन, त्यात कोणाचे तरी सुपरमॅन होणे
भोगणे, भोगले जाणे, भक्ष्यणे, भक्षिले जाणे
चालूच राहील अव्याहत दररोज ||
(originally composed 4th February 1997 – 10.0 am to 10.30 am last stranza composed
today 5 to 6 pm)
No comments:
Post a Comment