Tuesday, 6 May 2014

नोकरी सोडताना – २ - કવિતા - ઈતિહાસ થતા / कविता - इतिहास होताना

नोकरी सोडताना – २

एकूणच नोकरी सोडताना आपण त्या संस्थेसाठी, आपल्या सहकाऱ्यान साठी आणि इतर साऱ्यानसाठी इतिहास बनत आहोत असा भाव मनात कळतनकळत दाटत जातो. त्यातून सरकारी नोकरीत तर हा जास्तीच अनुभवास येतो. निवृतीच्या सहा महिने आधी सर्विस बुक बंद करणे, पेन्शन केस तयार होणे हि प्रक्रिया चालते आणि एक प्रकारे त्या माणसाचा त्या संस्थेमधला इतिहास बंद होऊ लागतो. बडोदे महानगरपालिकेत मुख्य लेखाधिकारी म्हणून मी निवृत्त होणारया हजारो कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक आणि पेन्शन केस वर अंतिम सही करून त्यांना इतिहास केले होते. त्याहीपुढे जाऊन ४० वर्षाहून जुन्या सर्विस बुक आणि पेन्शन केसेसना रेकोर्ड वरून दूर करण्याची सही करून मीच अनेक इतिहास मिटविले होते ह्या सत्याची जाणीव माझ्याच सर्विस बुकला मीच बंद करताना आणि माझाच पेन्शन केस मीच मंजूर करताना अतिशय तीक्ष्णपणे झाली. जणूकाही वैश्विक सत्याचा अचानक साक्षात्कार व्हावा तसे काहीसे झाले जेंव्हा माझ्याच  निवृतीच्या कागदांवर सही करून मीच मला इतिहास केले कालांतराने इतरांनी त्याला मिटविण्यासाठी. ह्या साऱ्या अनुभूतीतून साकारली पुढली कविता निवृतीच्या दोन दिवस आधी. पुन्हा ह्याहि वेळेस माझ्या भावनांनी व्यक्त होण्यासाठी आधार घेतला गुजराथी भाषेचा. कदाचित माझी कार्यालयीन भाषा गुजराथी असल्यामुळे माझ्या निवृत्ती आधीच्या अनुभूतिनी गुजराथी भाषेचा आधार घेतला व्यक्त होण्यासाठी आणि एक प्रकारे ते सयुक्तिकच होते. हि कविता केल्याच्या बारा वर्षांनी आज त्या मूळ कवितेला संस्कारित करण्याचा आणि तिचा अनुवाद करण्याचा योग आला.   

કવિતા - ઈતિહાસ થતા

સમજતો થયો ત્યારથી મનમાં ઘુમરાતો પ્રશ્ન,
ઈતિહાસ રચાય છે કઈ રીતે ?
ઈતિહાસ મટી જાય છે કઈ રીતે?
છેલ્લે જબાબ જડ્યો
જયારે મેં જોયો પોતાને
બંદ કરેલી સર્વિસ બુકમાં,
નવા ખોલેલા પેન્શન કેસમાં,
જકડાયેલો ઈતિહાસ થઈને  ||

પછી તો બધુજ સ્પષ્ટ થયું મનમાં
મેજ હજારોને બનાવ્યા હતા ઈતિહાસ
તેમની સર્વિસ બુક બંદ કરીને,
તેમના પેન્શન કેસ ખોલીને,
કાલાંતરે હજારોના આ ઈતિહાસોને
મેજ મિટાવ્યા હતા કળીકાળની જેમ  ||

હવે અસ્તિત્વમાં હોવા છતાં,
બની ગયો છું ઈતિહાસ કાગળોમાં
કોઈ સંસ્થા માટે, કેટલાક લોકો માટે
કાલાંતરે મટી જવા કાયમ માટે || 

(composed on 28/10/2012 11.0 to 11.15 pm)


कविता - इतिहास होताना

समजू लागले तेंव्हापासून
मनामध्ये घोटाळणारा प्रश्न
ईतिहास घडतो कसा?
ईतिहास मिटतो कसा?
अखेरीस उत्तर मिळाले
जेंव्हा मी पहिले मला
बंद केलेल्या सर्विस बुक मध्ये
नव्या उघडलेल्या पेन्शन केस मध्ये
जखडलेला इतिहास होऊन ||

सगळेच स्पष्ट झाले मग मनात
हजारोंना मीच बनविले होते ईतिहास
त्यांच्या सर्विस बुकात बंद करून
त्यांचे पेन्शन केस उघडून  
कालांतराने हजारोंच्या या इतिहासाना
मीच मिटविले होते कलीकाळासारखे ||

आता अस्तित्वात असूनही   
बनलो आहे इतिहास कागदोपत्री
कोण्या संस्थेसाठी, काही लोकांसाठी
कालांतराने कायमचा मिटून जाण्यासाठी ||

(translated from Gujarathi on 4th May 2014 6.15 to 6.45 pm)

2 comments:

  1. In the long run we are all dead. आणि म्हणूनच इतिहास लिहिला जातो, त्याची पाने जतन केली जातात आणि हो नंतर अभ्यासली देखील जातात. सर्वच जण काही निव्वळ इतिहासजमा होत नाहीत ……काही जण आपल्या पाउलखुणा या इतिहासात उमटवून जातात. तेंव्हा अशा माणसांनी इतिहासात मिटून जाण्याबद्दल बोलणे हा त्यांचा विनय असावा नाही? तेंव्हा शेवटची "कालांतराने कायमचे मिटून जाण्याबद्दलचा" उल्लेख वगळता आवडली ही कविता!

    ReplyDelete
  2. अभिप्राय आवडला. खर आहे सर्वच जण काही निव्वळ इतिहासजमा होत नाहीत पण मी नक्कीच त्यातला नाही तेंव्हा माझी कविता खरी ठरते. माझ्याविषयी येवढया मोठ्या / मानाच्या अभिप्रायाबद्दल आभार.

    ReplyDelete