Friday 24 April 2015

कविता – खूप पाहिले रंग दुनियेचे

दिनांक - २४/०४/२०१५ 

कविता – खूप पाहिले रंग दुनियेचे - मूळ लेखन०६/०२/१९९६; पुनर्लेखन १९/०४/२०१५

(मूळ लेखन०६/०२/१९९६ कोकणातल्या घरी दुपारी ३.० ते ३.२०, पुनर्लेखन १९/०४/२०१५ सकाळी ९.१५ ते ९.४५ बडोदे)

खूप पाहिले रंग दुनियेचे
आहे कोषात गुरफटून जायचे
जसा सुरवंट जातो कोषात
तंतूंच्या आतील काळोख्या समाधीत
आहे तसे उतरायचे कोषात मला
मिळविण्या आत्मभानाच्या इंद्रधनूला             ||

संपेन कदाचित आत
कुणाच्याही नकळत
मिळता आत्मभान
बदलेल कणनकण
लेवून दिव्य निळाई अंगभर
अगणित रंगप्रभा पंखांवर
तरंगत, बागडत वाऱ्याच्या लाटांवर
देत, घेत, पसरत आनंद सर्वभर
जगून सार्थकतेने

विखरून जाईन कणाकणाने                    ||

1 comment:

  1. रेशिम दान देण्या
    कोषी सुरवंट मरतो,
    रेशीमापरी आम्हा
    रविकांत प्रिय भावतो.

    वाऱ्यांच्या लाटांवर
    कोमल आनंद वाहतो
    रविकिरण पसरता
    जगात चैतन्य वाहवितो
    रविकांत आम्हा ज्यास्त प्रिय भावतो.

    ReplyDelete