Friday 3 April 2015

स्त्री अमेरिकेतली

ब्लॉग दिनांक – ०३/०४/२०१५

२० वर्षा पूर्वी अमेरिकेतली वास्तव्यात तिथल्या स्त्री विषयी जे जाणवले, तिथल्या स्त्रियांची परिस्थिती विषयी जी वाचायला, पाहायला, समजायला मिळाले त्याविषयीची ही कविता. आता तिथे कशी परिस्थिती असेल काय बदल झाले असतील माहीत नाही पण २० वर्षापूर्वी मला अमेरिकेत हे जाणवले होते की स्त्रिया सर्वच क्षेत्रात बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा अधिक उत्तम प्रकारे काम करू लागल्याने, स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या झाल्याने तिथे स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले होते, त्यांची  intensity (निर्घृणता) वाढली होती तसे आता आपल्या भारतात होऊ लागले आहे हे मात्र मला स्पष्टपणे जाणवते आहे. एकूणच भारतात साऱ्या अपराधातील निर्घृणता वाढते आहे आणि त्यातूनही स्त्रियांच्या बाबतीत होणारे अपराध, अत्याचार अधिकाधिक क्रूर होऊ लागले आहेत इतके की कविता लिहायची ठरवली तरी लिहवणार नाही ........

 कविता – स्त्री अमेरिकेतली (मूळ लेखन २८/०५/१९९; पुनर्लेखन ०१/०४/२०१६)


(मूळ लेखन २८/०५/१९९६ portland airport, USA सकाळी ६.३० ते ८.३०; पुनर्लेखन ०१/०४/२०१५ दुपारी ४.३० ते ५.३० बडोदे घरी)
इथे ती वावरते साऱ्या क्षेत्रात
ताठ मानेने, खांद्याला खांदा लावून
इथे ती उपभोगते आनंद
समतेचा, मुक्ततेचा, स्वतंत्रतेचा           ||

पण एकट्याने आभाळ डोक्यावर पेलताना
मान थकली तर विसाव्यासाठी
कोण्या खांद्यावर टेकण्याचा
खेळावा लागतो जुगार तिला              ||

मुक्ततेचा अर्थ समजण्याआधीच
स्वयंसिद्धा होण्याआधीच
अनावधानाने पडतात पायी अनेकींच्या
शृंखला निवडलेल्या अयोग्य विकल्पांच्या          ||

सतत बाळगावी लागते
टांगती तलवार तिला
न लवणारी ताठ मान
बर्बर्तेने तोडली जाण्याची                       ||

असुरक्षिततेचे सावट
एकटेपणाची व्याकुळता
शोषण, बलात्कार, अस्तित्वाची झुंज
जावेच लागते सामोरे तिला या साऱ्याला इथेही

सारे काही तेच आहे थोड्या फरकाने इथेही         ||

No comments:

Post a Comment