Wednesday 22 April 2015

कविता – लावतोय डावावर शब्द रद्दबातलेले

 कविता – लावतोय डावावर शब्द रद्दबातलेले (मूळ लेखन ११/०९/१९९६; पुनर्लेखन १८/०४/२०१५)

(मूळ लेखन ११/०९/१९९६; ऑफिसमध्ये दिवसभर; पुनर्लेखन १८/०४/२०१५, घरी दुपारी ४.३० ते ५.३०)

पत्यांच्या सर्वनाशी नादासारखा
जडलाय नाद शब्दांचा
पिसत राहतो शब्दांना एकसारखा
मांडत राहतो डाव तीन पत्तीचा            ||

शब्दांची अकल्पित संगती
प्रत्येक डावात उघडते रहाते
क्वचितच लागतात हाती
ट्रायो, सिक्वंस, कलरचे पत्ते
एरव्ही नेहमीच येतात हाती
शब्द निरर्थक, फतरी, तुटके              ||

हरणारा जुगारी दुपट्टीने खेळावा
तसा मी ही लावतोय शब्दांवर
उरल्यासुरल्या वेदना, अश्रू अपमान
रडीला येऊन वेडापिसा होऊन             ||


लावायला आता माझ्याजवळ डावाले
काही नाही अंतर्गाभ्यातले वा शब्दांपलीकडे
आहेत बेसुमार शब्द उरले

गुळगुळीत नाण्यासारखे रद्द्बातलेले                   ||



No comments:

Post a Comment