Thursday 9 April 2015

कविता – तुला ते लाभेल, कदाचित नाही

दिनांक - ०९/०४/२०१५ 

काही नवजात जीवांच्या नशिबी जन्मताच मातृसुखाचे हरवणे असते, अर्थात आयुष्याची सुरुवात जरी दुर्दैवाने झाली असली तरी आयुष्यभर ते दुर्दवीच राहतात असे नाही पण त्या क्षणी किंवा त्या काळापुरते ते दुर्दैवी असतात. शिवाय त्या दुर्दैवाच्या क्षणी पुढे त्याच्या आयुष्यात सुदैव / सुख येण्याची खात्री नसते. अनेकदा आपल्या मनात असूनही काही करू शकत नाही त्यांच्यासाठी. अशाच एक जीवा विषयीची ही कविता ..........

कविता – तुला ते लाभेल, कदाचित नाही

(मूळ कविता लेखन १८/०६/१९९६ विमान प्रवास – ऑरलॅन्डो – वॉशिंग्टन – रात्री ९.१५ तो ९.३५; पुनर्लेखन ०५/०४/२०१५ दुपारी ३.०० ते ३.३० हॉटेल हॅरीस, जकार्ता)

नाळ तुटते प्रत्येकाचीच
पहिल्या वहील्या श्वासातच
उरत फक्त नातं रक्ताचं
अन पिळवणाऱ्या आतड्याचं
नियतीने नाळ सुकण्याच्या आतचं
तोडले आहे नातं तुझ्याशी रक्ताचं         ||

नियतीच्या खेळापुढे
आम्ही सारे मूढ, निष्क्रिय, हतबल
वांझोट्या आमच्या सद्भावना, आशीर्वाद
आणि हे शब्दही                        ||

म्हणतात आकाशासाठी
त्या अज्ञातासाठी
मात्र सारेच समान असतात
सारेच रक्ताचे, नाळेचे, नात्याचे असतात

कदाचित तुला ते लाभेल, कदाचित नाही                      ||


3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. ज्याच्या त्याच्या नशिबी जे असेल ते घडेलच, आपण फक्त सदिच्छा व्यक्त करणारे व्हावे आणि म्हणूनच तुला ते लाभेल नंतरचा "कदाचित नाही" हा भाग तितकासा नाही रुचला.

    ReplyDelete
  3. तुमच्या काही कविता काही आधी वाचलेल्या काही नव्या.... पण आजकाल मी तुमच्या ब्लॉगवर डोकावते ते कविता इथे पोस्ट करताना त्याच्या पार्श्वभूमी संबंधी जे लिहिलेले असते ते वाचायला!

    ReplyDelete